esakal | संघाचा सार्थ अभिमान तसेच पराभवाचेही दुःख
sakal

बोलून बातमी शोधा

Croatia celebrates football team's victory

एका डोळ्यात अभिमान, दुसऱ्या डोळ्यात अश्रू याच शब्दांत क्रोएशियावासीयांच्या भावना शब्दबद्ध करता येतील. पराभवामुळे ते निराश होते, पण जागतिक उपविजेत्या संघाचेही त्यांना कौतुक होते. संघाच्या मायदेशातील स्वागतासाठी एक लाखाहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती.

संघाचा सार्थ अभिमान तसेच पराभवाचेही दुःख

sakal_logo
By
वृत्तसंस्था

झॅग्रेब : एका डोळ्यात अभिमान, दुसऱ्या डोळ्यात अश्रू याच शब्दांत क्रोएशियावासीयांच्या भावना शब्दबद्ध करता येतील. पराभवामुळे ते निराश होते, पण जागतिक उपविजेत्या संघाचेही त्यांना कौतुक होते. संघाच्या मायदेशातील स्वागतासाठी एक लाखाहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती.

फ्रान्सचा संघ चांगलाच खेळला, पण त्यांना आम्ही सुरवातीच्या दोन गोलची भेट दिली. अंतिम फेरीही खेळणे काही कमी नाही. आमच्या संघाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे 59 वर्षीय दार्को इलाकोवाच यांनी सांगितले. आज आम्ही रडत असलो तरी काही दिवसांतच तुम्हाला आमच्या चेहऱ्यावर संघाबाबतचा अभिमानच दिसेल असे 31 वर्षीय रॉबर्ट झैलिको याने सांगितले. 

दरम्यान, उपविजेत्या संघाचे मायदेशी विजेत्या संघाच्या थाटात स्वागत झाले. 44 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील किमान एक लाख चाहते झॅग्रेबला संघाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. सरकारी यंत्रणेने संघाच्या स्वागतासाठी कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी देण्याचे आवाहन केले होते. संघाच्या स्वागतासाठी देशभरातून झॅग्रेबला येणाऱ्या चाहत्यांसाठी रेल्वे तिकिटात पन्नास टक्के सूट देण्यात आली. संघाच्या कामगिरीने अर्थव्यवस्थेसही बळकटी आली. स्पर्धा कालावधीत टीव्ही संचांचीच विक्री चारशे पटींनी वाढली होती. 

loading image