रोनाल्डोने रेयालला तारले

वृत्तसंस्था
Friday, 20 April 2018

माद्रिद - ताकदवान बायर्न म्युनिकविरुद्धची लढत पाच दिवसांवर असताना रेयाल माद्रिदला ला लिगा अर्थात स्पॅनिश लीगमध्ये ॲथलेटिक बिल्बाओविरुद्धची लढत बरोबरीत सोडवल्याचेच समाधान लाभले. तीन मिनिटे असताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल केल्यामुळे रेयालला १-१ बरोबरी साधता आली.

रेयाल माद्रिद ला लिगाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीतून मागे पडत आहेत. ते आणि दुसऱ्या क्रमांकावरील ॲटलेटिको माद्रिद यांच्यात आता तीन गुणांचा फरक आहे. चॅंपियन्स लीगमध्ये बहरात असलेल्या रेयालला गेल्या चार लढतीत एकच विजय लाभला आहे. त्यापूर्वीचे बारापैकी अकरा सामने त्यांनी जिंकले होते. 

रोनाल्डोने गेल्या बारा सामन्यांतील बाविसावा गोल केला; पण त्यापूर्वी घरच्या मैदानावर चाहत्यांनी रेयालची हुर्यो उडवली. खरे तर चॅंपियन्स लीग लढत लक्षात घेऊन रेयाल रविवारच्या लढतीत अव्वल खेळाडूंना ब्रेक देतील; पण या वेळी त्यांचा खेळ लौकिकास साजेसा नव्हता. सदोष पास, चेंडूवर राखता न येणारी हुकमत, कोलमडणारी 
मधली फळी हे रेयालचे दुखणे झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: football Ronaldo saved Rayal