सलाह करतोय निवृत्तीचा विचार 

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेत इजिप्त संघाला आलेले अपयश त्यांचा प्रमुख खेळाडू महंमद सलाह याच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.त्याने इजिप्त फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. अर्थात, यामागे अपयश हे कारण नसून, खेळाडूंच्या लोकप्रियतेचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला गेल्यामुळे तो निराश होता. या निराशेतूनच त्याने हा निर्णय घेतल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 

वोल्गोग्राड - विश्‍वकरंडक स्पर्धेत इजिप्त संघाला आलेले अपयश त्यांचा प्रमुख खेळाडू महंमद सलाह याच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.त्याने इजिप्त फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. अर्थात, यामागे अपयश हे कारण नसून, खेळाडूंच्या लोकप्रियतेचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला गेल्यामुळे तो निराश होता. या निराशेतूनच त्याने हा निर्णय घेतल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

इजिप्त संघ चेचेन्या येथे वास्तव्याला असताना तेथील नेका रमजान कादिरोव यांनी सलाहला चेचेन्याचे मानद नागरिकत्व बहाल केले होते. कादिरोव यांची ही कृती सलाहला आवडली नव्हती. त्याबद्दल त्याने जाहीर निषेधही व्यक्त केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohamed Salah considering retiring from national team