उपांत्य फेरीतील संघात प्रीमियर लीग खेळाडूंचे वर्चस्व

वृत्तसंस्था
Tuesday, 10 July 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. 
 

लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. 

याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम संघातील सर्वाधिक खेळाडू या विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघात आहेत. यामध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार आणि स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या हॅरी केनचा समावेश आहे. 

हॅरी केन, डेल अली, डॅनी रोस, किएरन ट्रिपेर, एरिस डायर, जान वर्थांगेन, टॉबी अल्डरविल्ड, मौसा देम्बाले आणि हुगो लॉरिस हे नऊ खेळाडू टॉटेनहॅमचे आहेत. मॅंचेस्टर युनायटेड आणि चेल्सी यांचे प्रत्येकी सात यामध्ये रुमेलू लुकाकू, पॉल पॉग्बा, एडन हझार्ड आणि थिबॉट कॉर्टिस यांचा समावेश आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील आणखी एक संघ असलेल्या लिव्हरपूलचे चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळणार आहेत. 

प्रीमियर लीग वगळता स्पॅनिश लीगचे विजेते बार्सिलोना आणि पीएसजीमधील प्रत्येकी चार, तर युवेंटस आणि रेयाल माद्रिदचे प्रत्येकी तीन खेळाडू आहेत. चॅंपियन्स लीग जिंकणाऱ्या रेयालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ बाद झालेला असला तरी त्याच्या रेयाल माद्रिद या क्‍लबचे मारिओ मॅंडझुकी, ब्लासि मॅटुईडी, लुका मॉड्रिक आणि राफेल वर्नाने हे खेळाडू उपांत्य सामन्यात खेळणार आहेत. 

उपांत्य फेरीत संघात असलेल्या क्‍लब खेळाडूंची संख्या 
- टॉटेनहॅम ः 9, मॅंचेस्टर युनायटेड 7, चेल्सी 7, लिव्हरपूल 4, लिस्टर 2, आर्सनेल 1 (हे सर्व प्रीमियर लीगमधील संघ आहेत) 
- बार्सिलोना 4, पीएसजी 4, युव्हेंटस 3, रेयाल माद्रिद 3. 

 
व्यावसायिक खेळाडूंचे संघ 
- प्रीमियर लीगमधील ः सहा 
- स्पॅनिश लीगमधील ः दोन 
- फ्रान्स लीगमधील ः दोन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Premier League players dominate in semi finals