फुटबॉल विश्वकरंडकात धडकलं भारतीय हृदय

Russian boy, Indian heart. WorldCup 2018
Russian boy, Indian heart. WorldCup 2018

चेन्नई : डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी रशियात जाऊन विश्वकरंडक पाहण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र अलीकडेच त्यांना रशियातून रोमन नावाच्या मुलाचा फोन आला आणि त्याने ''माझ्याकडे तुमच्यासाठी तिकिटे आहेत, आपण एकत्र फुटबॉल विश्वकरंडक पाहू'' असे म्हणत बालकृष्णनांना रशियात येऊन विश्वकरंडक पाहण्याचे आमंत्रण दिले.   

डॉ. बालकृष्णन हे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रोमनला पहिल्यांदा भेटले. कार्डिओमायोपॅथी या आजाराने त्रस्त असलेल्या रोमानला श्वास घेण्यास अडचणी येत होत्या आणि त्यामुळे त्याच्या हृदयाचे काम मंदावले होते. रोमनला हृदय प्रत्यारेपण हा एकमेव पर्याय बरा करु शकणार होता. 

हा प्रक्रिया सांगताना डॉ. बालकृष्णन म्हणाले, ''हे फार अवघड होते. देशातील एकाही रुग्णांना जर एखादा अवयव नके असेल तरच तो परदेशी रुग्णांना देता येतो. त्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता, म्हणजे त्या हृदय मिळण्यासाठी या रक्तगटाच्या सर्व रुग्णांनी हृदय नाकारणे गरजेचे होते. या दरम्यान तमिळनाडूच्या राज्य प्रत्यारोपण संस्थेतून एका ब्रेन-डेड रुग्णाबद्दल माहिती मिळाली. परंतू त्याचे हृदय फक्त 35 टक्केच काम करत असल्याने अनेक डॉक्टरांनी ते नाकारले होते. तरीही दुसरा पर्याय नसल्याने त्या हृदयाचे प्रत्यारेपण करण्यात आले. 

काही दिवसांना रोमनच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तो एप्रिलमध्ये रशियाला परत गेला. फुटबॉल विश्वकरंडक सुरु झाल्यावर रोमनने डॉ. बालकृष्णन यांना रशियात येण्याचे आमंत्रण दिले. रोमनला जीवदान देणारे डॉ. बालकृष्णन रशियात फुटबॉल विश्वकरंडक पाहून भारतात परतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com