सौदी अरेबियाचे खेळाडू विमान अपघातातून वाचले 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात आलेल्या सौदी अरेबिया संघातील खेळाडू विमान अपघातातून बचावले. ही घटना सोमवारी घडली. सौदी अरेबिया संघ उरुग्वेविरुद्धच्या लढतीसाठी रशियन एअरवेजने सेंट पीटसबर्गवरून रोस्टोव येथे जात होता. त्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली.
 

रोस्टोव - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात आलेल्या सौदी अरेबिया संघातील खेळाडू विमान अपघातातून बचावले. ही घटना सोमवारी घडली. सौदी अरेबिया संघ उरुग्वेविरुद्धच्या लढतीसाठी रशियन एअरवेजने सेंट पीटसबर्गवरून रोस्टोव येथे जात होता. त्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली.

पायलटने विमान सुरक्षित लॅंड केल्यामुळे पुढील संभाव्य धोका टळला. त्या वेळी विमानात नेमके किती प्रवासी होते, हे समजलेले नाही. विमानातील उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागली होती, परंतु विमान सुखरूप उतरवण्यात आले असून, काळजीचे काही कारण नसल्याचे सौदी अरेबिया फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे. हतन बाहबिर या सौदी संघातील खेळाडूने त्या वेळी आम्ही घाबरलो होतो. केवळ देवाच्या कृपेमुळेच वाचलो, असे ट्‌विट केले आहे. 
 

Web Title: Saudi Arabia team safe after airplane scare involving an engine failure in Russia