मेस्सीचा अखेर चेल्सीविरुद्ध गोल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 February 2018

लंडन - मॅजिकल लिओनेल मेस्सीने अखेर चेल्सीविरुद्धचा गोलदुष्काळ संपवला; पण अखेर बार्सिलोनास चेल्सीच्या होम ग्राउंडवर लढत बरोबरीत सोडवल्याचे; तसेच अवे गोलमध्ये आघाडी घेतल्याचेच समाधान लाभले.

लंडन - मॅजिकल लिओनेल मेस्सीने अखेर चेल्सीविरुद्धचा गोलदुष्काळ संपवला; पण अखेर बार्सिलोनास चेल्सीच्या होम ग्राउंडवर लढत बरोबरीत सोडवल्याचे; तसेच अवे गोलमध्ये आघाडी घेतल्याचेच समाधान लाभले.

चेल्सीविरुद्धचा बारा वर्षे, ७४५ मिनिटे; तसेच आठ लढतीत गोल न केल्यानंतर मेस्सीने गोल केला. सहा वर्षांपूर्वी या दोघात लढत झाली होती, त्या वेळी मेस्सीची पेनल्टी क्रॉसबारवर लागली होती. त्यामुळे चेल्सीने बार्सिलोनाच्या कॅम्प नोऊ मैदानावर बाजी मारली होती. मात्र या वेळी मेस्सीने ७५ व्या मिनिटास आंद्रेस इनिएस्ता याच्या पासवर चेंडूला अचूक दिशा देत बार्सिलोनास बरोबरी साधून दिली. तेरा मिनिटांपूर्वी विलियन याने चेल्सीला आघाडीवर नेले होते. 

मेस्सी हा आमच्यासाठी तरी जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. आमचा त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. त्याला शक्‍य तितके मुक्तपणे खेळता येईल, याकडेच आमचे लक्ष असते. प्रतिस्पर्ध्यांचे त्याला चेंडूपासून दूर ठेवण्याचेच प्रयत्न असतात. तरीही तो प्रयत्नांची शर्थ करतो, असे बार्सिलोनाचा मध्यरक्षक इवान रॅकितीक याने सांगितले. 

मेस्सीचा गोलदुष्काळाचा इतिहास चेल्सीसाठी प्रेरणादायी होती. २०११-१२ च्या मोसमात मेस्सीने ७३ गोल केले होते; पण त्या वेळीही मेस्सी चेल्सीविरुद्ध गोल करू शकला नव्हता. यानंतरही जूनमध्ये ३१ वर्षांचा होणारा मेस्सी हाच बार्सिलोनाचा प्रमुख खेळाडू असल्याचे वारंवार अधोरेखित होत होते. त्यानेच अखेर चेल्सीचा अभेद्य वाटणारा बचाव भेदला. त्यासाठी त्यानेच दडपण आणले होते.

मेस्सी वि. विल्यम
  मेस्सीचे तो खेळलेल्या ३७ पैकी ३१ युरोपियन क्‍लबविरुद्ध गोल
  मेस्सीचे चॅंपियन्स लीगमधील इंग्लंडमधील संघाविरुद्धचे सर्वाधिक १८ गोल. या क्रमवारीत ख्रिस्तियानो रोनाल्डो (११) दुसरा
  चॅंपियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेस्सीचा सर्वाधिक २२ गोलचा विक्रम
  मेस्सीचा चेल्सीविरुद्धचा पहिला गोल नवव्या सामन्यात; तसेच ३० व्या शॉटवर
  चेल्सीच्या विल्यमची गोल किक पेनल्टी क्षेत्राबाहेरून
  विल्यमचा या प्रकारे या स्पर्धेत सहावा गोल. या स्पर्धेत तो मेस्सी, रोनाल्डोपेक्षा सरस

बायर्नचा धडाका
  मुएल्लरचे चॅंपियन्स लीगच्या बाद फेरीत २१ गोल. या क्रमवारीत रोनाल्डो, मेस्सीपाठोपाठ
  मुएल्लरने चॅंपियन्स लीग बाद फेरीच्या सलग आठव्या मोसमात गोल केला
  मुएल्लरने गोल केलेल्या ६२ व्या सामन्यांत बायर्न अपराजित
  बायर्नचा सलग १४ व्या सामन्यात विजय, आपल्याच १९८० च्या कामगिरीची बरोबरी
  चॅंपियन्स लीगच्या बाद फेरीच्या होम लढतीतील सर्वात मोठा विजय 
  लेवांडस्कीचे चॅंपियन्स लीगच्या गेल्या सोळा सामन्यांत १६ गोल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news champion league football competition