पैशासाठी फुटबॉलचा वापर नको - इन्फान्टिनो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 February 2018

झुरिच - फुटबॉलमधून येणारा पैसा हा त्या खेळाच्या प्रगतीसाठी असतो, अशा पैशाचा वापर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू नका, असा इशारा फिफाचे (जागतिक फुटबॉल महासंघ) अध्यक्ष जेअनी इन्फान्टिनो यांनी सर्व संलग्न फुटबॉल संघटनांना दिला आहे.

फुटबॉल संघटना आणि फेडरेशन चालवणारे प्रमुख; जे कोणी फुटबॉलमधून मिळणाऱ्या पैशातून स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो गैरप्रकार समजून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देताना इन्फान्टिनो यांनी, फुटबॉलमधून येणारा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा कोणीच विचार करू नये, असे स्पष्ट केले.

नौकछोट येथील फिफाच्या कार्यकारी सदस्यांच्या शिखर परिषदेत ते म्हणाले, फिफाला मिळणारा निधी संलग्न संघटनांना दिला जातो. त्याचा कसा वापर केला जातो, याच्यावरही फिफाचे लक्ष असणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक महासंघाला फिफाबरोबर करार करायला लावणार आहोत. त्याद्वारे उत्तरदायित्व आम्हाला निर्माण करायचे आहे. प्रत्येक निधीचे ऑडिटही होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football money