रोनाल्डोच्या दोन गोलने रेयालचा विजय

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

डॉर्टमुंड - ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने जर्मनीच्या बोरुसिया डॉर्टमुंडचा ३-१ असा पराभव करून यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील धमाकेदार सुरवात कायम राखली. त्यांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहे. त्याचबरोबर त्यांचा जर्मनीतील डॉर्टमुंडवरील पहिला विजय ठरला. 

डॉर्टमुंड - ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने जर्मनीच्या बोरुसिया डॉर्टमुंडचा ३-१ असा पराभव करून यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील धमाकेदार सुरवात कायम राखली. त्यांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहे. त्याचबरोबर त्यांचा जर्मनीतील डॉर्टमुंडवरील पहिला विजय ठरला. 

रेयालसाठी खेळताना रोनाल्डोचे देखील सातत्य कायम असून, त्याने आतापर्यंत ४०० सामन्यांत ४११ गोल केले आहेत. डॉर्टमुंडविरुद्धच्या विजयात सामन्याच्या अठराव्या मिनिटाला गॅरेथ बेल याने रेयालला आघाडीवर नेले. त्यानंतर रोनाल्डोने दोन गोल केले. सामन्याच्या ५४व्या मिनिटाला पिएरे एमेरिक औहबामेयांग याने डॉर्टमुंडसाठी एकमात्र गोल केले. 

या विजयाबद्दल बोलताना रेयालचा कर्णधार सर्गिओ रामोस म्हणाला, ‘‘आम्ही अनेक वर्षे जर्मनीत विजयाच्या प्रतीक्षेत होतो. एक दिवस आम्ही तो मिळवू याची खात्री होती आणि आज तो दिवस आला. डॉर्टमुंडचे आव्हान होते, पण आम्ही आमची ताकद दाखवून दिली. आम्हाला अजूनही आमचा सर्वोत्तम खेळ करायचा आहे.’’ त्याचवेळी डॉर्टमुंडच्या गोन्झालो कॅस्ट्रो याने आम्ही संधीचा फायदा उठविण्यात अपयशी ठरलो हे मान्य केले. तो म्हणाला, ‘‘आम्ही चांगला खेळ केला. एकवेळ आम्ही वर्चस्व राखण्याच्या संधीही निर्माण केल्या. पण, त्याचा फायदा उठवता आला नाही. रेयालच्या खेळाचे नेमके हेच वैशिष्ट्य होते. बेल आणि रोनाल्डो असे खेळाडू आहेत की, ज्यांना संधीचा फायदा कसा उठवायचे हे ठाऊक आहे. अशा भक्कम संघाविरुद्ध खेळताना संधी गमावणे हा मूर्खपणाच म्हणावा लागेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football Ronaldo's two goals scored by Rayal