esakal | भारतीय फुटबॉलबाबत शुक्रवारीच सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय फुटबॉलबाबत शुक्रवारीच सुनावणी

भारतीय फुटबॉलबाबत शुक्रवारीच सुनावणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताच्या विश्‍वकंरडक २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाच्या प्रयत्नात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाबाबतची सुनावणी शुक्रवारी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. या संदर्भात फुटबॉल महासंघानेच न्यायालयास विनंती केली होती.

भारतीय फुटबॉल महासंघाची गतवर्षी झालेली निवडणूक दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयास फुटबॉल महासंघाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक होईपर्यंत कारभार पाहण्यासाठी; तसेच निवडणुका घेण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्‍त एस. वाय. कुरेशी यांची नियुक्ती केली आहे. संलग्नता रद्द केलेल्या संघटनांचा प्रश्न निकालात काढून ही निवडणूक एका महिन्यात घेण्यास सांगितले आहे.

loading image