esakal | कोस्टारिकास हरवून जर्मनीची विजयी सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

कोस्टारिकास हरवून जर्मनीची विजयी सुरवात

कोस्टारिकास हरवून जर्मनीची विजयी सुरवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मडगाव - जर्मनीचा संघ दहाव्यांदा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळत आहे, पण त्यांना अजून जगज्जेतेपद मिळविता आलेले नाही. यावेळी विजेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना ख्रिस्तियन वुक यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने शनिवारी क गटात विजयाची नोंद केली.
बदली खेळाडू नोह आवुकू याने ८९व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलच्या बळावर कोस्टारिका संघास २-१ असे निसटते हरविले. 

बुंडेस्लिगा स्पर्धेत काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक पदार्पण केलेला कर्णधार जॅन-फिएट ॲर्प याने जर्मनीस आघाडीवर नेले. त्याने अपेक्षापूर्ती करणारा खेळ केला. संघाचा विजयी गोलही त्याच्याच असिस्टवर झाला. हॅम्बर्गर एसव्ही संघाच्या या आघाडीपटूने २१व्या मिनिटास पहिला गोल केला. जर्मनीने आघाडी पूर्वार्धाचा खेळ संपेपर्यंत टिकवून ठेवली होती. उत्तरार्धात कोस्टारिकाने पिछाडी भरून काढली. आंद्रेस गोमेझ याने ६४ व्या मिनिटास बरोबरीचा गोल नोंदविला.
आवुकू ६१ व्या मिनिटास बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याने संघात डेनिस जॅस्टरझेम्बस्की याची जागा घेतली होती.

loading image