वयोगट बदलला अन्‌ हिरो गवसला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली/मुंबई - विश्वकरंडक फुटबॉल इतिहासात भारताचा पहिला गोल नोंदवणारा खेळाडू म्हणून जिकसन सिंग याची नोंद झाली. हा जिकसन गवसला तो भारतीय फुटबॉल महासंघाने आय लीग कुमार गटाची वयोमर्यादा पंधरावरून सोळा वर्षांची केल्यामुळेच. 

भारतातील विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा लक्षात घेऊन चांगल्या खेळाडूंचा शोध सुरू होता. त्या वेळी तत्कालीन मार्गदर्शक निकोलाय ॲडम आणि भारताच्या संघाचे सीओओ अभिषेक यादव यांनी आय लीग कुमार स्पर्धेत पंधराऐवजी सोळा वर्षांखालील खेळाडूंना प्रवेश देण्याची सूचना केली. त्यामुळेच जिकसन यंदाच्या स्पर्धेत खेळू शकला. 

जिकसनच्या मिनर्व्हा एफसी संघाने मुंबईतील कूपरेज स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत विजेतेपद राखले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीतील निर्णायक गोल जिकसन सिंगने केला होता. त्याने वेगाने धावत येत चेंडूला दिलेली अचूक दिशा पाहून अभिषेक यादव प्रभावित झाले. त्यांनी विजेत्या मिनर्व्हा संघाची भारताच्या सतरा वर्षांखालील संघाविरुद्ध लढत खेळवण्याचा निर्णय घेतला. 

जिकसनने आपल्या मिनर्व्हा एफसीला भारतीय संघाविरुद्धही विजयी केले. या सामन्यातील निर्णायक गोलही जैक्‍सन याचाच होता. भारतीय संघाचे मार्गदर्शक लुईस नॉर्टन डे मातोस यांनी जिकसनची भारतीय संघाच्या शिबिरासाठी निवड केली नसती, तरच नवल होते. या संघातील सर्वात उंचापुऱ्या खेळाडूने संजीव स्टॅलिनच्या कॉर्नर पासवर चेंडू अचूक हेडर करीत भारताचा विश्वकरंडक इतिहासातील पहिला गोल केला. केवळ जिकसनच नव्हे, तर सध्याच्या भारतीय संघातील मोहम्मद शहाजहान, अन्वर अली, नाँगदाम्बा नाओरेम हे मिनर्व्हा संघातील खेळाडू भारतीय संघात आले.

कोण आहे जिकसन?
     मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यातील हाओखा मामांग गावचा रहिवासी
     कोंथौजाम डेबेन सिंग यांना पोलिस मणिपूर दलातील नोकरी २०१५ मध्ये ‘स्ट्रोक’मुळे सोडावी लागली
     आई इंफाळमधील खैरामबांद मार्केटमध्ये भाजी विकते
     मार्केट घरापासून २५ किलोमीटर दूर
     तिच्या कमाईवरच कुटुंबाची गुजराण
     जिकसन २०१५ मध्ये चंडीगडमधील ॲकॅडमीत होता; पण राष्ट्रीय संघात त्याची निवड होऊ शकली नाही
     सुमारे सहा फूट उंचीमुळे आधीचे प्रशिक्षक निकोलाय ॲडम यांच्या मते उंची वयाच्या मानाने जास्त
     याच जिकसनने जिद्दीच्या जोरावर १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक संघात स्थान मिळविले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news worldcup football competition