प्रतिस्पर्ध्यांचा आदर राखणारा कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

मुंबई - प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गोल केले, तरी त्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून आपण मैदानावर आनंद साजरा करत नाही, अशी विनम्र भावना भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केली. मुंबईतील इंटरकाँटिनेन्टल फुटबॉल स्पर्धेत काल तेपैईविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील तिसरी हॅट्ट्रिक केल्यानंतर छेत्री बोलत होता.

अंधेरीतील फुटबॉल एरिनामध्ये झालेल्या हा सामना छेत्रीचा ९९ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. सोमवारी तो शतक करणार आहे. आत्तापर्यंत त्याने ५९ गोल केलेले आहेत. गोल करतो याचा आनंद मला होत असतो; पण हा गोल आपल्यामुळेच झाला, असे मी समजत नाही. क्‍लब आणि देशाकडून गोल करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो; पण रॉबीन सिंगसारखा जल्लोष करणे मला आवडत नाही, असे छेत्रीने सामन्यानंतर सांगितले. आशिया करंडक स्पर्धेत बहरिन या तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गोल केला, तर मात्र मी त्याचा आनंद साजरा करेन, अशीही पुष्टी छेत्रीने जोडली.  देशातील अनेक तरुण फुटबॉलपटू तुला रोल मॉडेल म्हणून समजतात याबाबत विचारले असता, मला फॉलो करावे इतका मोठा फुटबॉलपटू मी नाही. मी स्वतःचाच खेळ उंचावण्याचा सदैव विचार करत असतो.

Web Title: sunil chhetri football player