ट्युनिशियाचा विश्वकरंडकाला विजयाने निरोप

वृत्तसंस्था
Saturday, 30 June 2018

अपयशाचे धनी राहिलेल्या ट्युनिशिया आणि पनामा या संघांतील अखेरच्या सामन्यात ट्युनिशियाने बाजी मारत 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा विजयाने निरोप घेतला. स्पर्धेचा निरोप घेताना त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेत 1978 नंतर दुसरा विजय मिळविल्याचे समाधान लाभले.

सारांस्क (रशिया) : अपयशाचे धनी राहिलेल्या ट्युनिशिया आणि पनामा या संघांतील अखेरच्या सामन्यात ट्युनिशियाने बाजी मारत 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा विजयाने निरोप घेतला. स्पर्धेचा निरोप घेताना त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेत 1978 नंतर दुसरा विजय मिळविल्याचे समाधान लाभले.

या दोन्ही संघांचे आव्हान केव्हाच संपुष्टात आले होते. त्यामुळे ही लढत केवळ औपचारिक होती. यात उत्तर अमेरिकन ट्युनिशियाने 2-1 असा विजय मिळविला. संपूर्ण सामन्यात ट्युनिशियाकडून गोल करण्याच्या 14 संधी निर्माण केल्या. पण त्यापैकी त्यांना केवळ दोनच साधता आल्या. एका विजयासह ते गटात तिसरे राहिले. यातही ते समाधानी हगोते. त्यांचे प्रशिक्षक नाबील मालौल म्हणाले, ""आमचे खेळाडू आजच्या विजयास पात्र होते. स्पर्धेसाठी आमच्या गटातील संघ बघितल्यावर आम्ही तिसरा क्रमांक मिळवला तरी समाधान असेल, असा विचार केला. आमच्याविरुद्ध अधिक गोल झाले असले, तरी ते सर्वोत्तम संघाविरुद्ध झाले हे लक्षात घ्या. या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत.''

वास्तविक सामन्यात पनामाने 33 व्या मिनिटाला मेरिआहने केलेल्या गोलने आघाडी घेतली होती. विश्रांतीला त्यांनी आघाडी राखलीदेखील होती. उत्तरार्धात ट्युनिशियाने आपला पवित्रा बदलला आणि 15 मिनिटांत दोन गोल केले. पहिला गोल 51व्या मिनिटाला बेन युसूफ आणि 66व्या मिनिटाला खाझरी याने दुसरा गोल करत बाजू भक्कम केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tunisia's world cup ends with a win