भारतीय महिला हॉकीची पाच दशके 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

छायाचित्र प्रदर्शनातून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा इतिहास लंडनमध्ये प्रदर्शित 

लंडन - भारतीय महिला हॉकीच्या विश्‍वकरंडक सहभागास पाच दशके झाली. त्यानिमित्ताने लंडनमध्ये खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भारतीय महिला हॉकीची प्रगती दाखवणारी 50 छायाचित्रे आहेत. आता या प्रदर्शनातील छायाचित्रे लंडनमधील हॉकी म्युझियमला दान करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. यात 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण यशाचाही उल्लेख आहे. भारतीय महिला हॉकीपटूंचे आनंदाचे; तसेच दुःखाचे क्षण टिपले आहेत. याचबरोबर यासोबत असलेला दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद यांची वंशावळही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

सुनील यश कालरा यांनी हॉकी म्युझियमच्या सहकार्याने "पाच दशके 50 छायाचित्रे' हे प्रदर्शन आयोजित केले आहे. भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा 1974 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी असलेल्या भारताच्या कर्णधार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. 

भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल; तसेच संघातील खेळाडूंनी यास आवर्जून भेट दिली. दिग्गज हॉकीपटूंची कामगिरी नक्कीच सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरीत करते. त्यांच्यापासून खूप काही शिकता येते, असे राणीने सांगितले. 
 

Web Title: Five Decades of indian women hockey