संयमी आक्रमणामुळेच यशस्वी - राणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - संयमी आक्रमणावर भर दिल्यामुळे वर्ल्ड हॉकी लीगमध्ये आम्हाला यश लाभले आहे. अजूनही आम्ही शिकत आहोत, असे सांगतानाच भारतीय कर्णधार राणीने आव्हानात्मक स्पर्धा जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मुंबई - संयमी आक्रमणावर भर दिल्यामुळे वर्ल्ड हॉकी लीगमध्ये आम्हाला यश लाभले आहे. अजूनही आम्ही शिकत आहोत, असे सांगतानाच भारतीय कर्णधार राणीने आव्हानात्मक स्पर्धा जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

चिली ताकदवान प्रतिस्पर्धी होते. पहिला गोल स्वीकारल्यानंतरही आम्ही हार मानली नाही. ही स्पर्धा खूपच आव्हानात्मक होती. वातावरण प्रतिकूल होते, तसेच सामन्याच्या वेळी पाऊसही होत असे, असे राणीने सांगितले. भारतीय संघाच्या व्यूहरचनेबद्दल ती म्हणाली, आम्ही या स्पर्धेत चांगला आक्रमक खेळ केला. त्याचबरोबर या स्पर्धेत मॅन टू मॅन मार्किंगही चांगले झाले. संयमी आक्रमणास नवे मार्गदर्शक पसंती देत आहेत. त्याचा आम्हाला फायदा होत आहे. आता चेंडूवर जास्त वर्चस्व ठेवतानाच गोल करण्याच्या संधीची प्रतीक्षा करण्याची तयारी असते. यापूर्वी आम्ही गोल करण्यासाठी जरा जास्तच उत्सुक होतो, त्यामुळे चुका होत असत. नवे मार्गदर्शक आशियाई आणि युरोपीय शैलीची सांगड घालत आहेत.

उपांत्य फेरीत बेलारुसला हरवल्यामुळे भारतीय संघाची उपांत्य फेरीची स्पर्धा निश्‍चित झाली होती, त्यामुळे दडपण दूर झाले होते. राणीला हे पूर्ण मान्य नाही. तिने ही स्पर्धा जिंकूनच आगेकूच करण्याचा आमचा इरादा होता.

इंडियन टायगर्सनी या स्पर्धेत चांगला खेळ केला. उत्तम सांघिक कामगिरी, तसेच चालीची सुरेख सांगता होत असल्यामुळेच विजयी झालो आहोत. प्रत्येक सामन्यागणिक खेळात सुधारणा झाली, हेही महत्त्वाचे आहे. नव्या वर्षातील पहिली स्पर्धा जिंकली आहे.
- मॅराइन सॉएर्ड, भारतीय मार्गदर्शक.

विजेतेपदाची आगळी हॅटट्रिक
भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीच्या टप्प्याच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. भारतीय महिला संघाने यापूर्वी 2013 आणि 2015 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या दोन्ही स्पर्धा दिल्लीतच झाल्या होत्या.
स्पर्धा/केंद्र प्रतिस्पर्धी निकाल कर्णधार
2013, दिल्ली जपान 2-2* रितू राणी
2015, दिल्ली पोलंड 3-1 रितू राणी
2017 व्हॅंकूव्हर चिली 3-1 राणी रामपाल
* ही स्पर्धा पूर्ण साखळी पद्धतीने झाली होती. सहा संघांच्या या स्पर्धेत भारताने (4) जपानपेक्षा (3) जास्त विजय मिळवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian women hockey team win