भारत-पाकिस्तान पुन्हा एका गटात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पात्रता सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानला ही आणखी एक संधी असेल.

आशिया करंडक हॉकी स्पर्धा ११ ते २२ ऑक्‍टोबरदरम्यान बांगलादेशात ढाका येथे होणार असून, या स्पर्धेतील विजेता संघ थेट विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. आशिया करंडक स्पर्धेचा कार्यक्रम आणि गटवारी सोमवारी निश्‍चित करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान एकाच ‘अ’ गटात आले असून, बांगलादेश आणि जपान हे अन्य दोन संघ या गटांत आहेत. 

आशियाई हॉकी महासंघाने आजच या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशाला देण्याचा निर्णय घेतला. आठ देशांमध्ये होणाऱ्या या दहाव्या स्पर्धेत भारत हा सर्वोत्तम मानांकन असलेला संघ आहे. यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या स्पर्धेत दक्षिण कोरियाने विजेतेपद मिळविले असून, त्यांचा मलेशिया, चीन आणि ओमान सह ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. 

पाकिस्तानला पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी अजून पात्रता सिद्ध करण्यात यश आलेले नाही. पात्रतेसाठी त्यांना या स्पर्धेद्वारे एक संधी मिळेल. मात्र, विजेतेपद मिळविणाराच संघ विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरणार आहे.

अशी होईल स्पर्धा
गट अ - भारत, पाकिस्तान, बांगलादेश, जपान
गट ब - मलेशिया, कोरिया, चीन, ओमान
कार्यक्रम
११ ऑक्‍टोबर - भारत वि. जपान (दुपारी ३ वा.), 
पाकिस्तान वि. बांगलादेश (सायं. ५.३०) 
१२ ऑक्‍टोबर - मलेशिया वि. चीन (दु. ३.०० वा.), 
कोरिया वि. ओमान (सायं. ५.३० वा.)
१३ ऑक्‍टोबर - जपान वि. पाकिस्तान (दु. ३.०० वा.), 
भारत वि. बांगलादेश (सायं. ५.३०)
१४ ऑक्‍टोबर - चीन वि. ओमान (दु. ३.०० वा.), 
कोरिया वि. मलेशिया (सायं. ५.३०), 
१५ ऑक्‍टोबर - जपान वि. बांगलादेश (दु. ३.००), 
पाकिस्तान वि. भारत (सायं. ५.३०)
१६ ऑक्‍टोबर - मलेशिया वि. ओमान (दु. ३.००), 
चीन वि. कोरिया (सायं. ५.३०)
१८ आणि १९ ऑक्‍टोबर - सुपर फोर आणि पाचव्या-आठव्या क्रमांकासाठी सामने
२० ऑक्‍टोबर - सातव्या-आठव्या आणि पाचव्या-सहाव्या क्रमांकासाठी सामने
२१ ऑक्‍टोबर - सुपर फोर सामने
२२ ऑक्‍टोबर - तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठी तसेच अंतिम लढत

Web Title: sports news asia karandak hockey competition