भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

जोहान्सबर्ग - कर्णधार राणी आणि प्रीती दुबे यांच्या सुरेख समन्वयाने साधलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने बुधवारी वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या टप्प्यातील स्पर्धेत चिलीचा १-० असा पराभव केला. या विजयाने त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत  प्रवेश केला.

पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत गेल्यानंतर उत्तरार्धात सामन्याच्या ३८व्या मिनिटाला राणीने रचलेल्या सुरेख चालीवर प्रीतीने गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर बचावाच्या आघाडीवर चोख भूमिका बजावत भारतीय महिलांनी विजय मिळविला. चिलीच्या खेळाडूंनी १७ वेळा भारताच्या पेनल्टी कक्षात धडक मारली. पण, त्यांना जाळीच्या दिशेने एकही फटका मारता आला नाही. त्याउलट भारताने १६ वेळा चिलीच्या पेनल्टी कक्षात धडक मारताना जाळीच्या दिशेने पाच फटके मारले. 

त्यापूर्वी सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळविण्याची जणू चढाओढ लागली होती. चौथ्याच मिनिटाला चिली, नंतर १२व्या मिनिटाला भारताने कॉर्नर मिळविला. मात्र या दोन्ही संघांनी हे कॉर्नर वाया घालवले. विशेष म्हणजे १२व्या मिनिटाला कॉर्नरवर रिबाउंड आलेल्या चेंडूवर भारताने पुन्हा कॉर्नर मिळविला. तो त्यांनी साधला देखील. त्या वेळी चिलीने व्हिडियो रेफरलची मागणी केली. पंचांनी व्हिडिओ पाहून भारताला गोल नाकारला. चेंडू स्टिकला नव्हे, तर शरीराला लागून जाळीत गेल्याचे स्पष्ट दिसून आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey World hockey league semi-finals