चौरंगी हॉकी स्पर्धेत भारत अखेर उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - ऑलिंपिक उपविजेते बेल्जियम घालत असलेले कोडे सोडवण्यास भारतास चौरंगी हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीतही अपयश आले. न्यूझीलंडमधील या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत भारतास १-२ अशा पराभवास सामोरे जावे लागले. 

गेल्या काही महिन्यांतील माफक अपवाद सोडल्यास भारत बेल्जियम लढतीत फारसे वेगळे काही घडत नाही. बेल्जियमने सुरवातीपासून भारतीयांवर दडपण आणण्याची मालिका कायम ठेवली. भारतीयांनी संधी दवडत आपल्यासमोरील आव्हान खडतर केले. 

टॉम बून याने चौथ्या मिनिटास बेल्जियमचे खाते उघडले. मनदीप सिंगने १५ मिनिटांनी भारतास बरोबरी साधून दिली. सेबॅस्टियन डॉकियर याने ३६ व्या मिनिटाला केलेला गोल अखेर निर्णायक ठरला.

साखळी लढतीच्या तुलनेतच काहीसा चांगला खेळ झाला, हीच समाधानाची बाब. नवोदित खेळाडू बेल्जियमविरुद्धच्या लढतीतून नक्कीच शिकले असतील. बेल्जियम गोलरक्षकाने खूपच चांगला खेळ केला.
- शुअर्ड मरिन, भारतीय मार्गदर्शक

Web Title: sports news india win in hockey competition