हॉकी संघाची ‘आकाश’भरारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई/भुवनेश्‍वर - आकाश चिकटेने पेनल्टी शूटआउट; तसेच सडनडेथमध्ये प्रभावी गोलरक्षण केल्यामुळे भारताने ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला हरवून वर्ल्ड हॉकी लीग अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. 

कलिंगा स्टेडियमवरील ही लढत सुरू झाली, त्या वेळी कट्टर हॉकी चाहतेही भारताच्या विजयाची खात्री देत नव्हते. भारत त्यांच्या गटात तळाला होता व एकही लढत जिंकली नव्हती, तर बेल्जियम गटातील सर्व लढती जिंकून विजेते होते. भारतीयांनी आपला खेळ उंचावताना बेल्जियमला गोल करण्यासाठी झगडण्यास भाग पाडले. चाहत्यांनी सातत्याने आपल्यावर दाखवलेला हाऊसफुल विश्‍वास हॉकी संघाने सार्थ ठरवला. 

विश्रांतीस गोलशून्य बरोबरी होती, त्या वेळी बेल्जियमला रोखल्याचे समाधान होते; पण तिसऱ्या सत्रात गुरजांत आणि हरमनप्रीतने तीन मिनिटांच्या अंतराने गोल करीत भारतास स्वप्नवत आघाडी मिळवून दिली. चौथ्या सत्राच्या सुरवातीस बेल्जियमने बरोबरी साधली. रूपिंदर पालने पुन्हा भारतास आघाडीवर नेले; पण हे काही मिनिटेच टिकले. त्याच सुमारास भारताने दुसऱ्या सत्रात बदललेल्या आकाश चिकटेला मैदानात आणले होते व तीच चाल अखेर निर्णायक ठरली. 

आकाश चिकटेच्या भक्कम गोलरक्षणामुळे भारत पेनल्टी शूटआउटमध्ये कधीही मागे पडला नाही. त्याने तीन गोलपासून बेल्जियमला रोखले. भारतीय आक्रमकांनी संधी साधल्या असत्या, तर कदाचित याच वेळी विजय लाभला असता. या शूटआउटमध्ये २-२ बरोबरी झाली. सडनडेथमध्ये हरमनप्रीतने गोल केल्यावर आकाश चिकटेने आर्थर डॉरेनचा शॉट रोखला. 

भारताचा बेल्जियमविरुद्धचा हा ४६ वा विजय
दोघांत यापूर्वी ७२ लढती, त्यात भारताचे १७ पराभव होते
गेल्या पाचपैकी चार लढतींत भारताची हार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news world hockey league competition