राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 501.8 आणि 518 गुणांसह 14 वर्षे गटातील दोन्ही संघ अव्वल असून मुलींच्या गटात त्रिपुरा (511.5) तर मुलांच्या गटात पश्‍चिम बंगाल (492) हे द्वितीय स्थानी आहेत.

औरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 501.8 आणि 518 गुणांसह 14 वर्षे गटातील दोन्ही संघ अव्वल असून मुलींच्या गटात त्रिपुरा (511.5) तर मुलांच्या गटात पश्‍चिम बंगाल (492) हे द्वितीय स्थानी आहेत.

 देशभरातील सातशे खेळाडूंचा समावेश असलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाने 14 वर्षे वयोगटात आपले अव्वल स्थान कायम केले आहे. बुधवारी (ता. 30) झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी 501.5 गुणांची कमाई करून अंतिम फेरीसाठी सर्वाधिक गुण घेऊन आपली पात्रता सिद्ध केली.

या गटात महाराष्ट्राच्या पाठोपाठ पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड या संघांचा समावेश अंतिम फेरीत राहणार आहे. दुसरीकडे मुलींच्या गटात महाराष्ट्रापाठोपाठ त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, दिल्ली आणि गुजरात संघ आपले कसब दाखविणार आहेत. महाराष्ट्राकडून आर्या तांबे, सुहानी गिरीपुजे, रिद्धी बचीम, मृणाल बनाती, मृणाल खोत, रूपेश सांगे, ओमकराज भोर, यश पी., ओम कोल्हे यांनी वैयक्तिक कामगिरीत चमक दाखवीत महाराष्ट्राची विजयी पताका उंचावर नेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Yoga Championship in Aurangabad