esakal | एशियाडमध्ये असलेल्या पेनकाक सिलातची राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन

बोलून बातमी शोधा

एशियाडमध्ये असलेल्या पेनकाक सिलातची राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन

दोन वर्षापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत असलेल्या वुशुची राज्यस्तरीय स्पर्धा झाली. आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्यावेळीच जास्त चर्चेत असलेल्या पेनकाक सिलात या क्रीडा प्रकाराने त्यापुढील पाऊल टाकले आहे

एशियाडमध्ये असलेल्या पेनकाक सिलातची राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः दोन वर्षापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत असलेल्या वुशुची राज्यस्तरीय स्पर्धा झाली. आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्यावेळीच जास्त चर्चेत असलेल्या पेनकाक सिलात या क्रीडा प्रकाराने त्यापुढील पाऊल टाकले आहे. या खेळाची राष्ट्रीय कुमार तसेच किशोर स्पर्धा झाली आहे आणि वरिष्ठ स्पर्धेची पूर्वतयारीही सुरु झाली आहे. 

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

राष्ट्रीय किशोर पेनकाक सिलात स्पर्धा 4 मे रोजी झाली, तर कुमार गटाची स्पर्धा 7 ते 10 मे दरम्यान झाली. या दोन्ही स्पर्धात मिळून साडेतीनशे स्पर्धकांचा सहभाग होता. मार्शल आर्टस््सारखा क्रीडा प्रकार असलेल्या या क्रीडा प्रकाराच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले होते. या राष्ट्रीय किशोर तसेच कुमार गटातील स्पर्धकांना रोख पारितोषिकेही देण्यात आली. किशोर गटात 155 तर कुमार गटात 193 स्पर्धांचा सहभाग होता. 

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

ही स्पर्धा ऑनलाईन झाली. पाच जजनी स्पर्धकांची कामगिरी थेट पाहिली त्याचवेळी खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचे चित्रिकरणही पाठवण्यास सांगितले होते. त्यासाठी मुदत दिली होती. स्पर्धकांनी घरातूनच आपले कसब दाखवले. स्पर्धकांच्या उत्साही प्रतिसादाने आमचा आत्मविश्वास ऊंचावला आहे, असे महासंघाचे सीईओ मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच इ-प्रमाणपत्र देण्यात आले. 

महाराष्ट्राच्या वैष्णवी, रुद्रला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी या ऑनलाईन स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. कुमारी गटातील मुलींच्या स्पर्धेत वैष्णवी गोर्डे हीने रौप्यपदक जिंकले, तर राज्याच्याच कृणाक्षी येवले हीने ब्राँझ जिंकले. मुलांच्या गटात रुद्र नाळे याने रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.