
वयाच्या 87 व्या वर्षी चारुलता यांचे निधन झाले आहे.
मुंबई : क्रिकेट हा भारतीयांसाठी खेळ नसून एक वेड आहे. अशाच एका क्रिकेटचे वेड असलेल्या भारतीय संघाच्या सर्वात वयस्कर चाहत्या अशी ओळख असलेल्या चारुलता पटेल यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्येविश्वचषक स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी चारुलता या मैदानात आल्या होत्या.
महत्त्वाची बातमी :धोनी निवृत्ती घेतोय वाचा सविस्तर वृत्त
वयाच्या 86 व्या वर्षी देखील क्रिकेटबदल असणारा त्यांचा उत्साह पाहून खेळांडूसह सर्वच चाहत्यांनी देखील तोंडात बोटे घातली होती. मागील वर्षी इंग्लंड येथे पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी चारुलता पटेल या स्वत: मैदानात आल्या होत्या. यावेळी त्यांचा खेळासाठीचा उत्साह पाहून कर्णधार विराट कोहली स्वत: त्यांची भेट घेण्यासाठी गेला होता. या भेटीचे व्हिडीओ आणि फोटो देखील समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले होते.
हेही वाचा : या गोलंदाजाकडून बाद व्हायला आवडत नाही : विराट कोहली
13 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजता चारुलता यांचे यांचे निधन झाले असून याबद्दलची माहिती त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या नातीने शेअर केली आहे. त्यानंतर बीसीसीआयने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर चारुलता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले असून चारुलता नेहमी आमच्या मनात राहतील असे या ट्विटमध्ये बीसीसीआयने म्हटले आहे.
#TeamIndia's Superfan Charulata Patel ji will always remain in our hearts and her passion for the game will keep motivating us.
May her soul rest in peace pic.twitter.com/WUTQPWCpJR
— BCCI (@BCCI) January 16, 2020