लायसन कोचिंग परीक्षेत अंजू शिवाजी तुरंबेकरचे यश

संदीप खांडेकर
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - एशियन फुटबॉल काॅन्फिडरेशनतर्फे झालेल्या 'अ' लायसन कोचिंग परीक्षेत बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील अंजू शिवाजी तुरंबेकर हिने उत्तीर्ण होऊन झेंडा फडकवला. परीक्षेत उत्तीर्ण होणारी ती महाराष्ट्रातील पहिली महिला असून देशातील पाचवी आहे.

चोवीस जणांनी ही परीक्षा दिली. त्यात दोन महिलांचा समावेश होता. ती राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. फिफा च्या सतरा वर्षाखालील मिशन इलेव्हन मिलियनची टेक्निकल हेड म्हणून तिने काम पाहिले आहे. नेदरलँड व इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोचिंग ट्रेनिंगसुध्दा तिने घेतले आहे. सध्या आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या ग्रास रुट डेव्हलपमेंट कोर्सची ती प्रमुख आहे. 
अंजूचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यालय, आठवी ते दहावी गडहिंग्लज हायस्कूल, तर बारावीपर्यंतचे छत्रपती शिवराज महाविद्यालयातून झाले. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ती पदवीधर आहे.

Web Title: Kolhapur News Anjali Turmbekar success in Layson coaching exam