शिवाजी तरुण मंडळाचा ऋणमुक्तेश्वर मंडळावर विजय

संदीप खांडेकर
शनिवार, 31 मार्च 2018

कोल्हापूर - अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० ने एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांच्या अक्षय सरनाईकने स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदवली. 

कोल्हापूर - अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० ने एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांच्या अक्षय सरनाईकने स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदवली. 

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (ब) संध्यामठ तरुण मंडळावर सडनडेथवर १-० ने मात केली. श्री नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे छत्रपती शाहू स्टेडियममवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

शिवाजीकडून अक्षय सरनाईक ने ६ व्या मिनिटाला गोल केला. लगेच त्याने ८ व्या मिनिटाला हेड द्वारे चेंडूस गोलजाळीची दिशा दाखवली. त्यानंतर शिवाजीकडून आक्रमक चढाया झाल्या. पण, दिशाहीन फटक्यांमुळे त्यांचे गोल मध्ये रुपांतर झाले नाही. 

उत्तरार्धात ऋणमुक्तेश्वरच्या अनिरुध्द शिंदे याने गोल करण्याची सोपी संधी दवडली. शिवाजीकडून अक्षय सरनाईकने ४२ व्या मिनिटाला ऋणमुक्तेश्वरच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला. शिवाजीच्या खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण ठेवत वारंवार ऋणमुक्तेश्वरच्या दिशेने चढाया केल्या. ऋणमुक्तेश्वरच्या खेळाडूंनी शिवाजी संघाच्या खेळाडूंना रोखून धरण्यावर भर दिला. ऋणमुक्तेश्वरकडे स्ट्रायकर खेळाडूंची उणीव असल्याने त्यांच्या चढायांमध्ये आक्रमकतेचा अभाव जाणवला. शिवाजीकडून अभिषेक सावंतने संदीप पोवार याच्या पासवर जादा वेळेत गोल केला. 

संध्यामठ विरुद्ध प्रॅक्टिस सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोरा राहिला. चेंडू दोन्ही संघांच्या गोलक्षेत्रात फिरता राहिला. शाॅर्ट व लाँग पास देत चढायांचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात समन्वय नव्हता. उत्तरार्धात संध्यामठचा अजिंक्य गुजरने प्रॅक्टिसच्या गोलजाळीसमोर चेंडूवर नियंत्रण असताना पास देण्यात वेळ खाऊपणा केला. त्याची री प्रॅक्टिसच्या रोहित भोसलेने ओढली. संध्यामठच्या गोलक्षेत्रात चेंडू मिळूनही त्याने फटका मारण्यात दिरंगाई केली. आकाश मायने याला तर चेंडूला संध्यामठच्या गोलजाळीत ढकलता आला नाही. गोलची ही सोपी संधी त्याने दवडल्याने प्रेक्षकही हळहळले. या चुकीची परतफेड त्याने ७० व्या मिनिटाला केली. त्यांच्या रजत जाधवने मारलेला चेंडू संध्यामठच्या वरच्या गोलखांबाला लागून मैदानात परतताच त्याला आकाशने हेड द्वारे गोलजाळीत ढकलले. 
संध्यामठच्या अक्षय पाटीलने ७२ व्या मिनिटाला हेड द्वारे गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरवर झाला. 

* लढवय्या खेळाडू - अशिष पाटील (संध्यामठ तरुण) 
* सामनावीर - आकाश मायने (प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) 

*  संध्यामठ               * प्रॅक्टिस 
- शाॅट्स  - ४                 - शाॅट्स - ३
- काॅर्नर किक  -   ६      - काॅर्नर किक - ३
- चेंडूवर नियंत्रण - ५०% - चेंडूवर नियंत्रण - ५०%

* आजचे सामने
- साईनाथ स्पोर्ट्स विरुद्ध कोल्हापूर पोलिस संघ, वेळ - दुपारी २ वाजता. 
- खंडोबा तालीम मंडळ (अ) विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (ब), वेळ - दुपारी - ४ वाजता. 

* असा झाला टायब्रेकरवर.... 
* संध्यामठ                * प्रॅक्टिस 
- अशिष पाटील -गोल   - रोहित भोसले - गोल
- सागर भालकर - गोल - रजत जाधव - चेंडू गोलजाळीवरुन                     
- मोहित मंडलिक - गोल - चेतन डोंगरे - गोल 
- रोहित पौंडकर - गोल - ओंकार भुरके - गोल 
- सिध्देश साळोखे - चेंडू तटवला - आकाश मायने - गोल 

* सडनडेथ 
- अजिंक्य गुजर - गोल - रजत जाधव - गोल 
- सिद्धार्थ कुराडे - चेंडू तटवला - श्लोक साठम - गोल 

* शिवाजी                 * ऋणमुक्तेश्वर 
- शाॅट्स  - ४                 - शाॅट्स - २
-काॅर्नर किक  -७            - काॅर्नर किक - ८
- चेंडूवर नियंत्रण-५५%- चेंडूवर नियंत्रण- ४५%

Web Title: Kolhapur News Atal award Football competition