साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विजयी

संदीप खांडेकर
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर -  'ब' गट साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला स्पर्धा समितीने विजयी घोषित केले. रंकाळा तालीम मंडळाने अनधिकृत खेळाडू खेळविल्याबद्दल त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.

अक्षय व्हरांबळे याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. केएसएने ऋणमुक्तेश्वरला विजयी घोषित केल्याचे पत्र आज दिले. 

रंकाळा विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यातील सामन्यात रंकाळाने अक्षय व्हरांबळे याला अनधिकृतपणे खेळविल्याचा आरोप ऋणमुक्तेश्वरने केला होता. त्याबाबतचे निवेदनही दिले होते. तसेच सायंकाळी पुरावेसुद्धा सादर केले होते. त्यावर स्पर्धा समितीने बैठक घेऊन रंकाळा तालीम मंडळावर दंड ठोठावला. अक्षय हा महाराष्ट्र पोलिस संघातून राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. तो पुन्हा रंकाळा तालीमकडून खेळला. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. 

Web Title: Kolhapur News Football competition