भारत - बांग्लादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट सामना रविवारी कोल्हापूरात

संदीप खांडेकर
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर -  भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट सामना रविवारी (ता. १ एप्रिल ) होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी साडे अकरा वाजता त्यास सुरवात होईल.

कोल्हापूर -  भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट सामना रविवारी (ता. १ एप्रिल ) होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी साडे अकरा वाजता त्यास सुरवात होईल.

महाराष्ट्रात प्रथमच ही स्पर्धा होत आहे, अशी माहिती दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिंपिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल पोवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संघात कोल्हापूरच्या कमलाकर कराळे व अनिल पोवार यांचा समावेश आहे. मालिकेतील उर्वरित सामने मुंबईतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे होतील. 

श्री. पोवार म्हणाले, "भारतीय संघात एकवीस खेळाडू व पाच पदाधिकारी, तर बांग्लादेश संघात पंधरा खेळाडू व दोन पदाधिकारी असतील. भारतीय संघाच्या कर्णधारपदी रमेश सरतापे व उपकर्णधारपदी लक्ष्मण बिरांडे, बांग्लादेशच्या कर्णधारपदी महंमद मोहसीन व उपकर्णधारपदी नूर नहीम आहेत." 

Web Title: Kolhapur News International wheel Chair Cricket Match on Sunday