प्रॅिक्‍टस क्लबच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत प्रॅिक्‍टस क्‍लबच्या दोन्ही संघांनी आज विजयी सलामी दिली. प्रॅिक्‍टस ‘ब’ संघाने साईनाथ स्पोर्टस्‌वर २-१, तर प्रॅिक्‍टस अ संघाने शिवाजी तरुण मंडळाचा ५-० असा धुव्वा उडविला. शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत प्रॅिक्‍टस क्‍लबच्या दोन्ही संघांनी आज विजयी सलामी दिली. प्रॅिक्‍टस ‘ब’ संघाने साईनाथ स्पोर्टस्‌वर २-१, तर प्रॅिक्‍टस अ संघाने शिवाजी तरुण मंडळाचा ५-० असा धुव्वा उडविला. शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

दुपारच्या सत्रातील सामन्यात जॉन्सन जोसो याच्या गोलच्या जोरावर प्रॅिक्‍टस ब संघाने पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली. श्‍लोक साटम, मैनुद्दीन सैद, सुशील कदम, रोहित भोसले, शुभम मस्कर यांनी जोरदार चढाया केल्या. उत्तरार्धात ४२ व्या मिनिटाला सोहेल अलीरखान याने ‘साईनाथ’कडून एका गोलची परतफेड केली. उत्तरार्धात या संघाने गोलच्या परतफेडीसाठी प्रयत्न केले. प्रॅिक्‍टसच्या बचावफळीने प्रयत्न निष्फळ ठरविले.
दुसऱ्या सामन्यात प्रॅिक्‍टस ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवाजी तरुण मंडळावर ५-० असा एकतर्फी विजय मिळविला. प्रॅिक्‍टसने यंदा परदेशी खेळाडूंना संधी देत स्थानिक खेळाडूंचाही समतोल साधला आहे. माणिक पाटील याच्या कॉर्नरवर फॅनियनने गोल नोंदवून १-० अशी आघाडी घेतली. राहुल पाटीलने दुसरा गोल नोंदवून पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली.

‘शिवाजी’कडून आकाश भोसले, सुमित जाधव, अक्षय सरनाईक, प्रदीप पाटील, प्रथमेश कांबळे यांनी चढाया केल्या. उत्तरार्धात प्रॅिक्‍टसने खेळाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. बचाव, मध्य आणि आघाडीच्या स्तरावर दबदबा निर्माण करून प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. गणेश दाते याच्या पासवर फॅनियनने तिसऱ्या गोलची नोंद केली. आक्रमणातील सातत्य कायम असताना प्रतीक बदामे याने चौथ्या गोलची आघाडी घेतली. सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना माणिक पाटीलने गोलपोस्ट रिकामा असल्याचा फायदा घेत पाचवा गोल नोंद केला.

Web Title: Kolhapur News KSA Football competition