केएसए फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडीची खंडोबा तालीम (अ) वर मात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोल्हापूर - फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर (अ) २ विरुद्ध १ गोलफरकाने मात करत केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. फुलेवाडीच्या भक्कम बचावफळीमुळे खंडोबाच्या खेळाडूंच्या चढाया फोल ठरल्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर (अ) २ विरुद्ध १ गोलफरकाने मात करत केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. फुलेवाडीच्या भक्कम बचावफळीमुळे खंडोबाच्या खेळाडूंच्या चढाया फोल ठरल्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

फुलेवाडीच्या सूरज शिंगटेने अक्षय मंडलिकच्या पासवर तिसऱ्या मिनिटाला गोल केला. खंडोबाकडून कपील साठे, अर्जुन शेतगावकर, सुधीर कोटीकेला यांनी पुढच्या फळीतून फुलेवाडीची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंतील असमन्वय व दिशाहीन फटक्‍यांमुळे त्यांनी बचावफळी भेदून गोल करणे जमले नाही. फुलेवाडीच्या शुभम साळोखेने अक्षय मंडलिकच्या पासवर २८ व्या मिनिटाला गोल करत खंडोबाला धक्का दिला. दोन गोलची आघाडी झाल्याने खंडोबाने चढायांचा जोर वाढवला. या वेळेत सिद्धार्थ शिंदे याने फुलेवाडीच्या गोलक्षेत्रातून फुलेवाडीच्या गोलजाळीच्या दिशेने चेंडूस फटका मारला. फुलेवाडीचा खेळाडू उमेश भगत याच्या डोक्‍यास चेंडू लागून ३३ व्या मिनिटाला गोलजाळीत शिरला आणि या स्वयंगोलमुळे खंडोबाने फुलेवाडीविरुद्ध बरोबरी साधली. 

उत्तरार्धात फुलेवाडीच्या रोहित मंडलिकने फ्री किकवर खंडोबाच्या गोलक्षेत्रातून मारलेला चेंडू गोलजाळीजवळून गेला. खंडोबाकडून रणवीर जाधवच्या पासवर कपील साठे, सुधीर कोटीकेला, सुधीरच्या पासवर रणवीर यांनी गोलच्या संधी दवडल्या. फुलेवाडीकडून मंगेश दिवसेने अक्षय मंडलिकच्या पासवर, तर सूरजने केनचौरच्या पासवर गोल करण्यासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली. या वेळेत खंडोबाकडून विक्रम शिंदेने फ्री किकवर फुलेवाडीच्या गोलजाळीच्या दिशेने मारलेला चेंडू फुलेवाडीच्या खेळाडूला तटला, तर फुलेवाडीकडून शुभम साळोखेने गोलची संधी गमावली. अखेरच्या क्षणी खंडोबाचा सुधीर गोल करण्यात कमी पडला. 

आजचा सामना : 
पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, 
वेळ - दुपारी ४ वाजता.

Web Title: Kolhapur News KSA Football competition