केएसए लीगमध्ये पाटाकडील तालीम "अ'चा "बालगोपाल'वर विजय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोल्हापूर - फुटबॉल शोकिनांनी तुंडुब भरलेल्या शाहू स्टेडीयमवर पाटाकडील तालीम मंडळाने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर 3-0 अशा एकतर्फी विजय मिळवून आपल्या खात्यात आणखी तीन गुणांची कमाई केली. तीनही गोल सामन्याच्या उत्तरार्धात झाले. केएसए लीगमध्ये पीटीएमच्या खात्यावर सात गुण जमा झाले आहेत. 

कोल्हापूर - फुटबॉल शोकिनांनी तुंडुब भरलेल्या शाहू स्टेडीयमवर पाटाकडील तालीम मंडळाने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर 3-0 अशा एकतर्फी विजय मिळवून आपल्या खात्यात आणखी तीन गुणांची कमाई केली. तीनही गोल सामन्याच्या उत्तरार्धात झाले. केएसए लीगमध्ये पीटीएमच्या खात्यावर सात गुण जमा झाले आहेत. 

दोन्ही तुल्यबळ संघातील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली. पुर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या. दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असल्याने पहिलल्या गोलची आघाडी कोण घेते याकडे लक्ष लागले होते. दोन्ही संघाच्या समर्थकांसह प्रेक्षकांना उत्कंटा होती. प्रत्येक फटक्‍याला टाळ्यांची दाद मिळत गेली. आघाडी, मध्य आणि बचावफळी अशा तिन्ही स्तरावर चुरशीचा खेळ झाला. आघाडीफळीतील खेळाडूंचे आक्रमण बचावफळीतील खेळाडू परतावून लावत होते. पीटीएमकडून अक्षय मेथे-पाटील, ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार जाधव, वृषभ ढेरे, एकीम यांनी चौफेर चढाया केल्या. बालगोपालकडून ऋतुराज पाटील, सूरज जाधव, डोलस्की, सचिन गायकवाड, श्रीधर परब, रोहित कुरणे यांनी तितक्‍याच ताकदीने चढाया केल्या. पुर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांच्या पाठीराख्यांनी सुटकेचा निश्‍वाःस सोडला. 

उत्तरार्धात दोन्ही संघांनी रणनितीत बदल केला. सुरवातीला बालगोपालचे खेळाडू आक्रमक वाटत होते; मात्र चढायांचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. सुरवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या पीटीएमच्या खेळाडूंनी नंतर खेळाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. अशाच एका चढाईत अक्षय मेथे पाटील याने कूच केली. त्याच्या मागे ऋषीकेश होता. त्याने अक्षयकडे पासची मागणी केली. त्याच्या अचूक पासवर ऋषीकेशने लहान गोलक्षेत्रात चेंडूला जोरदार फटका मारत गोलजाळ्याजी दिशा दिली. 1-0 च्या आघाडीमुळे पीटीएमच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आक्रमणातील सातत्य कायम असताना बालगोपालच्या बचावपळीतील ढिलेपणाचा फायदा घेत ऋषीकेषच्या पासवर एकीमने दूसऱ्या गोलची नोंद केली. दोन गोलच्या आघाडीनंतर प्रेक्षक बाहेर पडण्याच्या तयारीत असताना वृषभ ढेरे याने मैदानी गोल नोंदवून 3-0 अशी आघाडी घेतली. 

उद्याचा सामना 
फुलेवाडी क्रीडा मंडळविरूद्ध संध्यामठ 
वेळ :सायंकाळी 4 वाजता 
 

Web Title: Kolhapur News KSA Football competition