कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत

संदीप खांडेकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने अंतिम फेरीत आज प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई संघावर टायब्रेकरवर १-०ने विजयाची नोंद केली.

कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने अंतिम फेरीत आज प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई संघावर टायब्रेकरवर १-०ने विजयाची नोंद केली. त्यांच्या प्रतीक्षा मिठारी हिने केलेला गोल निर्णायक ठरला. उद्या (ता. २५) त्यांची नागपूर संघाविरुद्ध अंतिम लढत होईल. नाशिक येथे स्पर्धा सुरु आहे.

मुंबई सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना  कोल्हापूर जिल्हा संघाने आज वेगळ्या डावपेचांची रचना केली. पूर्णवेळेत कोल्हापूर जिल्हा संघाची गोलरक्षक अर्पिता पवार हिने उत्कृष्ट गोल क्षेत्ररक्षण केले. तिने मुंबई संघाच्या चढाया रोखून धरल्या. संघातील पौर्णिमा साळी व अधिका भोसले यांनी मुंबईच्या गोल जाळीवर जोरदार चढाया केल्या. मात्र, त्यांचे गोलमध्ये रुपांतर झाले नाही.

आकांक्षा सूर्यवंशी, ऋतुजा सूर्यवंशी, पृथ्वी गायकवाड यांनी मध्य व पौर्णिमा, तर सुचिता पाटील, मृणाल खोत, जुलेखा भिजली, प्रतीक्षा चांदणे यांनी बचाव फळीत उत्कृष्ट खेळ केला. पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरवर झाला.

टायब्रेकरवर कोल्हापूर जिल्हा संघाकडून प्रतीक्षा मिठारी हिला गोल करता आला. पृथ्वी गायकवाड, मृणाल खोत, ऋतुजा सूर्यवंशी यांना गोल करण्यात अपयश आले. मुंबई संघाच्या खेळाडूंनी फटकाविलेले चेंडू अर्पिता पवार हिने अडविले. तिने तीन फटके रोखून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Web Title: Kolhapur News Maharashtra State Inter District women football competition