राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैष्णवी सुतार हिची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोल्हापूर - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे. ती उद्या (ता.३०)  रवाना होत आहेत.

कोल्हापूर - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे. ती उद्या (ता.३०)  रवाना होत आहेत.

पँरा टेबल टेनिसमधून देशातील फक्त दोन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांपैकी सुतार या कोल्हापूरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय रँकिंगच्या जोरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA), स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडीया (SAI) व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (TTFI) निवड करण्यात आली.

तिने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन कास्यपदक, ६ राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रजत पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय कास्यपदक विजेती अपंग (पॅरा) टेबल टेनिसपटू बनण्याचा मान मिळवला आहे. तिचे आंतरराष्ट्रीय मानांकन २१ व एशियन मानांकन ११ आहे त्यामुळे त्यांची निवड झाली आहे. तिला असाध्य अशा मस्कुलर डिस्टॅाफी (Muscular/Multiple Dystrophy) (ज्यावर अजूनही उपचारपद्धतीचा शोध लागला नसून संशोधन अजूनही सुरु आहे) आजारामुळे हातातील व पायातील कमकुवतपणामुळे अपंगत्व प्राप्त झाले. पण त्यामुळे खचून न जाता आलेल्या अपंगत्वाला बाजून सारून, अपंगत्वाशी झुंज देत, बिकट परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर तिने पदके मिळवली आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, देवस्थान कमिटी अध्यक्ष महेश जाधव यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. 

Web Title: Kolhapur News Vaishnavi Sutar selected