राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघ जाहीर

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

या स्पर्धेतून निवडेला महाराष्ट्रचा मुलींचा संघ दिल्ली येथे आणि मुलांचा संघ पदुचेरी येथे होणाऱ्या 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत आपले काैशल्य सिद्ध करेल.

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकूल येथे 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील सर्व सामने संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी राज्यातील विविध विभागातून आलेल्या खेळाडूंची तसेच स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या आणि सहभागी खेळाडूंमधून निवडलेल्यांची राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली. त्यामधून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची निवड करण्यात आली.

शिवछत्रपती पुरस्कार्थी मिथीला गुजर, राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती विजया खोत या निवड समितीने निवडलेल्या संघाची घोषणा जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केले.
 
नाईक यांनी जाहीर केलेला 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ असा. 
मुले ः यश राजेमहाडीक (कोल्हापूर विभाग), तेजराज मांढरे (कोल्हापूर), ओजस आंबेडकर (पुणे), यश माने (पुणे), विवेक बडेकर (कोल्हापूर), ज्ञानेश पाटील (पुणे), अरगा घन्टा (मुंबई), अनिकेत राऊत (मुंबई), दिप औकीरकर (कोल्हापूर), जितेंद्र चौधरी (पुणे), राजेश्‍वर परदेशी (औरंगाबाद), देवांशू देशमुख (अमरावती). राखीव ः राजेंद्र सिंग (पुणे), ऍस्लो लोबो (मुंबई), अशरफ सय्यद (नाशिक), ऋषिकेश अवटे (मुंबई), हर्षल मारोतकर (नागपूर).

मुली ः आभा लाड (नागपूर विभाग), सुझॉन पिंटो (मुंबई), करीना सूर्यवंशी (नाशिक), पुर्वी महले (नागपूर), देवश्री आंबेगावकर (नागपूर), आश्‍विनी चरणकर (कोल्हापूर), सानिका किराड (पुणे), तनिका शानभाग (कोल्हापूर), दिपाली खांबे (कोल्हापूर), सिद्धी बादापूरे (कोल्हापूर), श्रेया नागतोडे (नागपूर), कॅलीयन डेव्ही (नाशिक). 
राखीव ः सानिका देशमुख (पुणे), मेलोडी मेनझेस (मुंबई), पूजा दोशी (नाशिक), आर्या नायर (मुंबई), सरस्वती देवकर (लातूर).

दरम्यान या स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स कॉलेजने प्रथम, पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजने द्वितीय, मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फादर ऍग्नेल स्कूलने तृतीय तसेच औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवगिरी महाविद्यालयाने चतुर्थ क्रमांक मिळविला.

मुलींच्या गटात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजने प्रथम, पुण्याच्या फर्ग्यसुन कॉलेजने द्वितीय, कोल्हापूर विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या वारणाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने तृतीय तसेच मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माटूंगातील आर. ए. पोदार कॉलेजने चतुर्थ क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक रमेश शानभाग, प्राचार्य के. जी. कानडे, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, प्राचार्य मिथिला गुजर, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, शारिरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.वाय.जाधव, क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय, विजया खोत, तालुका क्रीडाधिकारी अभय चव्हाण, तालुका क्रीडाधिकारी बळवंत बाबर, क्रीडाधिकारी स्नेहल जगताप, क्रीडाधिकारी राजेंद्र अतनूर, क्रीडा मार्गदर्शक महेश खूटाळे, प्रा. जे.के.गुजर, प्रा. गौरव जाधव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Team announced for national inter school basketball tournament