फ्रान्सचा त्सोंगा सलामीलाच गारद

पीटीआय
Wednesday, 19 April 2017

माँटे कार्लो - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. देशबांधव ॲड्रीयन मॅन्नारिनो याने त्याला ६-७ (३-७), ६-२, ६-३ असे हरविले.

माँटे कार्लो - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. देशबांधव ॲड्रीयन मॅन्नारिनो याने त्याला ६-७ (३-७), ६-२, ६-३ असे हरविले.

जागतिक क्रमवारीत त्सोंगा दहाव्या स्थानावर आहे, तर मॅन्नारीनो त्याच्या ४६ क्रमांक खाली आहे. त्सोंगाने त्याला आधीच्या एकमेव लढतीत हरविले होते. मार्च महिन्यात त्सोंगाला मुलगा झाला. त्यामुळे त्याने ‘ब्रेक’ घेतला होता. त्याला सातवे मानांकन होते. पहिल्या सेटमध्ये त्याने सुरवातीलाच आघाडी घेतली. नंतर टायब्रेकमध्ये सेट गेल्यावर त्याने अनुभवाच्या जोरावर आघाडी घेतली. नंतर मात्र ३० वर्षांच्या त्सोंगाचा खेळ खालावला.

मॅन्नारीनो याने पहिले पाच गेम जिंकले. हा सेट जिंकून त्याने बरोबरी साधली. मग निर्णायक सेटमध्ये त्याने सुरवातीलाच आघाडी घेतली. त्सोंगाने ३-४ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर रॅकेटचे स्ट्रींग तुटल्यामुळे त्याचा फोरहॅंडचा फटका बाहेर गेला. परिणामी त्याची सर्व्हिस खंडित झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adrian Mannarino