वॉशिंग्टनमधील विजयासह अँडी मरेचे पुनरागमन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन : ब्रिटनच्या अँडी मरे याने 'एटीपी वॉशिंग्टन ओपन' टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने जागतिक क्रमवारीत 80व्या स्थानावर असलेल्या मॅकेन्झी मॅक्‍डोनाल्डला 3-6, 6-4, 7-5 असे हरविले. 

मरेच्या कंबरेवर जानेवारीत शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो पुनरागमन करीत आहे. 11 महिन्यांच्या ब्रेकमुळे मरेची 832व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याला सात मॅचपॉइंट लागले. निर्णायक सेटच्या दहाव्या गेममध्ये त्याने पाच मॅचपॉइंट दवडले. त्याने सर्व्हिसही गमावली. अखेर त्याने 12व्या गेममध्ये विजय नक्की केला. 

हा सामना दोन तास 37 मिनिटे चालला. 31 वर्षांच्या मरेने सांगितले, की 'मी चिवट संघर्ष केला. माझे फुटवर्क आणि एकूण खेळ छान झाला. मी कच खाल्ली नाही. मी खेळाचा आनंद लुटला.' मरेची आता चौथा मानांकित देशबांधव काईल एडमंडशी लढत होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andy Murray's return with the victory in Washington