सानियाचा मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णावर विजय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 January 2017

मेलबर्न - सानिया मिर्झाने क्रोएशियाचा जोडीदार इव्हान डॉडीग याच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. या जोडीने भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाची गॅब्रिएला डॅब्रोवस्की यांच्यावर 6-4, 3-6, 12-10 अशी मात केली. सुपर टाय-ब्रेकमध्ये सानिया-डॉडीगने दोन मॅचपॉइंट वाचविले. हा सामना एक तास सात मिनिटे चालला. दुसरे मानांकन असलेल्या सानिया-डॉडीगने मोक्‍याच्या क्षणी सरस खेळ केला. या पराभवामुळे बोपण्णाच्या आशा संपुष्टात आल्या. त्याला पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते. उपांत्यपूर्व फेरीचा एक सामना लिअँडर पेस-मार्टिना हिंगीस आणि ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर-सॅम ग्रॉथ यांच्यात होत आहे. यातील विजयी जोडीशी सानिया-डॉडीग यांची लढत होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: austrolian open tennis competition