उझबेकिस्तानने 'व्हाइट वॉश' टाळला

वृत्तसंस्था
Monday, 10 April 2017

माझा खेळ सुरेख झाला. लढतीचा निकाल स्पष्ट होता. त्यामुळे मी खेळात सुधारण्यावर विशेषत: डबल फॉल्ट होणार नाहीत, याकडे अधिक लक्ष दिले. ज्या पद्धतीने नियोजन केले होते. त्यानुसार खेळ झाला. ही कामगिरी मला मोसमातील अन्य स्पर्धांसाठी प्रेरक ठरेल. माझा खेळ सुरेख झाला. लढतीचा निकाल स्पष्ट होता. त्यामुळे मी खेळात सुधारण्यावर विशेषत: डबल फॉल्ट होणार नाहीत, याकडे अधिक लक्ष दिले. ज्या पद्धतीने नियोजन केले होते. त्यानुसार खेळ झाला. ही कामगिरी मला मोसमातील अन्य स्पर्धांसाठी प्रेरक ठरेल. माझा खेळ सुरेख झाला. लढतीचा निकाल स्पष्ट होता. त्यामुळे मी खेळात सुधारण्यावर विशेषत: डबल फॉल्ट होणार नाहीत, याकडे अधिक लक्ष दिले. ज्या पद्धतीने नियोजन केले होते. त्यानुसार खेळ झाला. ही कामगिरी मला मोसमातील अन्य स्पर्धांसाठी प्रेरक ठरेल. 
- रामकुमार रामनाथन
- रामकुमार रामनाथन
- रामकुमार रामनाथन

बंगळूर : आशिया-ओशियाना गटातील दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारताने प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानवर विजय मिळवून जागतिक गटात प्रवेश मिळविला असला, तरी त्यांना 'व्हाइट वॉश' देण्यात अपयश आले. परतीच्या एकेरीच्या लढतीत रविवारी रामकुमार रामनाथन याने विजय मिळविला; तर प्रज्ञेश गुणेश्‍वरनला पराभवाचा सामना करावा लागला. 

भारताने प्रथमच पेसच्या गैरहजेरीत दुहेरीची लढत जिंकून विजयी आघाडी घेतली होती. जागतिक गटातील त्यांची लढत आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. 

'केएसएलटीए'च्या कोर्टवर रामनाथन याने कमालीचे सातत्य राखताना संझार फैझीएव याच्यावर 67 मिनिटांत 6-3, 6-2 असा सहज विजय मिळविला. दुसऱ्या परतीच्या लढतीत पदार्पण करणाऱ्या प्रज्ञेशला वेगवान सर्व्हिस करणाऱ्या तेमुर इस्माईलोव याचा सामना करता आला नाही. येथील वातावरणाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेत इस्माईलोव याने प्रज्ञेशचे आव्हान 7-5, 6-3 असे संपुष्टात आणले. 

प्रज्ञेश आणि इस्माईलोव दोघांनी वेगवान सर्व्हिस केल्या; पण पदार्पणाच लढतीत प्रज्ञेश दडपणाचा सामना करू शकला नाही. हाच दोघांच्या खेळातील फरक ठरला. या पराभवामुळे भारताला डेव्हिस करंडक लढतीत प्रतिस्पर्ध्याला व्हाइट वॉश देण्याची भारताची संधी हुकली. यापूर्वी 2014 मध्ये भारताने इंदूर येथील लढतीत तैवानला व्हाइट वॉश दिला होता. 

आपल्या पद्धतीने संघ आणि खेळाडूंना हाताळताना महेश भूपतीने कर्णधारपदाच्या पहिल्याच लढतीत मोठे यश मिळविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins Davis Cup tennis match against Uzbekistan