फेडरर-नदाल पुन्हा आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 March 2017

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची पर्वणी टेनिसप्रेमींना पुन्हा एकदा मिळेल. इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या चौथ्या फेरीत हे दोघे आमनेसामने आले आहेत.

नदालने देशबांधव फर्नांडो व्हरडॅस्कोवर 6-3, 7-5 अशी मात केली. फेडररने अमेरिकेच्या स्टीव जॉन्सनचे आव्हान 7-6 (7-3), 7-6 (7-4) असे परतावून लावले.

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची पर्वणी टेनिसप्रेमींना पुन्हा एकदा मिळेल. इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या चौथ्या फेरीत हे दोघे आमनेसामने आले आहेत.

नदालने देशबांधव फर्नांडो व्हरडॅस्कोवर 6-3, 7-5 अशी मात केली. फेडररने अमेरिकेच्या स्टीव जॉन्सनचे आव्हान 7-6 (7-3), 7-6 (7-4) असे परतावून लावले.

नदालने कारकिर्दीत मास्टर्स मालिकेतील 28 विजेतिपदे मिळविली आहेत. यात त्याने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. त्याने एकूण खेळाविषयी समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, 'माझी सर्व्हिस आक्रमक झाली. फोरहॅंडचे फटके चांगले बसले. बॅकहॅंडचे फटकेही छान जमून आले.

आधीच्या फेरीच्या तुलनेत खेळ चांगला झाला.'' गेल्या वर्षी याच फेरीत त्याने व्हरडॅस्कोला हरविले होते. या वेळी पहिल्या सेटमध्ये त्याने आठव्या गेममध्ये "लव्ह'ने ब्रेक नोंदविला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने तिसऱ्याच गेममध्ये ही कामगिरी केली. चौथ्या गेममध्ये त्याची सर्व्हिस खंडित झाली; पण 11व्या गेममध्ये त्याने आणखी एक ब्रेक नोंदविला.
फेडरर आणि जॉन्सन यांच्यापैकी एकही खेळाडू एकही ब्रेक नोंदवू शकला नाही. हा सामना एक तास 34 मिनिटे चालला. फेडररने चार ब्रेकपॉइंट गमावले; पण "फर्स्ट सर्व्ह'वर त्याने केवळ सहा गुण गमावले. फेडररने ही स्पर्धा चार वेळा जिंकली आहे. 2014 व 15 मध्ये तो उपविजेता ठरला. दोन्ही वेळा त्याला नोव्हाक जोकोविचने हरविले होते.

दृष्टिक्षेपात
- फेडरर-नदाल यांच्यात 35 सामने
- नदाल 23 विजयांसह आघाडीवर
- फेडररने 12 विजय
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत फेडररची सरशी

फेडररकडे फार अवघड गोष्टी अगदी सहजतेने करण्याची गुणवत्ता आहे. तो चेंडू फार लवकर मारू शकतो. सर्व्हिस तसेच पहिल्या फटक्‍याच्या जोरावर तो "वीनर्स' मारू शकतो. तो चेंडू नेहमी आतून मारतो. तो नेटजवळ वेगाने धाव घेतो.
- नदाल

राफासारख्या खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळावे म्हणूनच मी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतो. आता आमची लढत होईल. मी फार आतुर होईन. अन्यथा, येथे येऊन खेळण्यात काहीच अर्थ नसेल. दुबईतील स्पर्धेत मी थकलो होतो, पण आता एनर्जी आली आहे.
- फेडरर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian wells tennis competition