esakal | महाराष्ट्राची ईरा शहा विजेती
sakal

बोलून बातमी शोधा

Ira-Shaha

महाराष्ट्राची ईरा शहा विजेती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - अखिल भारतीय टेनिस संघटना व आसाम टेनिस संघटनेच्या वतीने गुवाहाटी येथे झालेल्या सुपर सीरिज टेनिस स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात पुण्याच्या ईरा शहाने विजेतेपद मिळविले. 

बारा वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या इरा शहाने चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत तेलंगणाच्या रिधी पोका चौधरीवर ६-२, ७-५ असा विजय मिळविला. 

या लढतीत बेसलाइनवरून खेळ करताना ईरा शहाने बॅक हॅण्ड व फोरहॅण्डचा सुरेख वापर करत गुण मिळविले. त्याआधी उपांत्य फेरीत ईरा शहाने कर्नाटकच्या सोहा सिंगला ७-५, ७-५ असे हरविले होते. इरा शहा सेंट मेरीज प्रशालेत सहावीत इयत्ते शिकत असून ती केतन धुमाळच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.