इटालियन ओपनसाठी शारापोवाला वाइल्ड कार्ड

पीटीआय
Thursday, 2 March 2017

रोम - आगामी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी मारिया शारापोवाला वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होईल. तिने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. येत्या एप्रिलमध्ये शारापोवाला स्टुटगार्टमधील स्पर्धेने पुनरागमन करीत आहे. शारापोवाने कारकिर्दीत पाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे शारापोवावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Italian Open wild card for Sharapova