माझा द्वेष करणाऱ्यांकडूनच अपप्रचार - पेस

वृत्तसंस्था
Tuesday, 20 September 2016

नवी दिल्ली - ‘काही स्पर्धक माझा कमालीचा द्वेष करतात. यामुळेच ते अपप्रचार करतात, पण मी त्यांची फिकीर करीत नाही. मी इतिहास घडविण्यात व्यग्र आहे आणि तो कुणीही बदलू शकणार नाही,’ असा प्रतिटोला टेनिसपटू लिअँडर पेस याने लगावला आहे.

ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा डेव्हिस करंडक लढतीच्या वेळी नेहमी वाद निर्माण होतात, पण अपप्रचारच त्यास कारणीभूत असल्याचा दावा त्याने केला. तो म्हणाला की, ‘या मंडळींना माझी प्रतिमा मलिन करायची आहे. त्यासाठीच ते छुप्या कारवाया करीत राहतात. त्यामुळे लिअँडर हा ‘वाईट मनुष्य’ आहे असा समज लोकांमध्ये निर्माण होतो. प्रतिमा, लौकिक निर्माण करायला सारे आयुष्य खर्ची घालावे लागते आणि ते उद्‌ध्वस्त करायला एक सेकंद पुरतो.’

अशा नकारात्मकतेचा कंटाळा आला आहे का, या प्रश्‍नांवर पेसने सांगितले की, ‘शेवटी मी एक मनुष्य आहे, पण आता मी त्याकडे लक्ष देत नाही. जे लोक खरे वागतात आणि प्रामाणिक आहेत ते माझ्याशी चांगले किंवा वाईट वागले तरी मी त्यांचा आदर करतो.’ आपल्यावर भूंकणाऱ्या अशा मंडळींची फिकीर करीत नसल्याची तीव्र प्रतिक्रियाही पेसने व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leander Paes hits out at fellow players; creates new controversy