डेव्हिस करंडकातून पेसला वगळले

Sakal | Friday, 7 April 2017

दुहेरीसाठी कर्णधार भूपतीची रोहन बोपण्णाला पसंती बंगळूर - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याचा डेव्हिस करंडक स्पर्धेतील 27 वर्षांचा प्रवास आज थांबला. उझबेकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया-आशियाना गटातील लढतीसाठी कर्णधार महेश भूपती याने दुहेरीसाठी रोहन बोपण्णाला पसंती दिली.