मिश्र दुहेरीत पेसचा विजय; महिला दुहेरीत सानियाचा पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताला दुहेरीत रविवारी संमिश्र यश मिळाले. मिश्र दुहेरीत लिअँडर पेसने मार्टिना हिंगीसच्या साथीत विजयी सलामी दिली, तर चौथ्या मानांकित सानिया मिर्झाला बार्बोरा स्ट्रायकोवाच्या साथीत पराभवाचा सामना करावा लागला.

पेस-हिंगीसने डेस्टानी अईआवा-मार्क पोलमन्स जोडीचा 6-4, 6-3 असा पराभव केला. सानिया-स्ट्रायकोवा जोडीला जपानच्या ई होझुमी-एम काटो जोडीकडून 3-6, 6-2, 2-6 अशा पराभवाचा सामना करावा लागला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paes wins mixed double