डॉनस्कॉयचा फेडररला धक्का

डॉनस्कॉयचा फेडररला धक्का

दुबई - तीन मॅच पॉइंट गमाविणाऱ्या रॉजर फेडररला दुबई टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या एवेगनी डॉनस्कॉय याने फेडररला ३-६, ७-६ (९-७), ७-६(७-५) असे पराभूत केले. 

जागतिक क्रमवारीत आघाडीचे स्थान भूषविलेल्या ३५ वर्षीय फेडररला दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकमध्ये मॅट पॉइंट साधता आला नाही. त्याचबरोबर तिसऱ्या सेटमध्ये टायब्रेकला मिळविलेली ५-१ अशी आघाडीही टिकवता आली नाही. या दोन्ही चुकांचा फायदा उठवत डॉन्सकॉय याने फेडररवर सनसनाटी विजयाची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीत आता त्याची गाठ फ्रान्सच्या लुकास पौईलशी पडेल. 

पात्रता फेरीतून आलेला २६ वर्षीय डॉनवस्की जागतिक क्रमवारीत ११६व्या स्थानावर आहे. फेडररवरील विजयाने तो चांगलाच प्रेरित झाला होता. तो म्हणाला, ‘‘मी आज प्रत्येकाला चकित केले. मुळात फेडररवर जो विजय मिळविला, तो सर्वप्रथम चकित झालेला असतो. माझे स्वप्न साकार झाले. कोर्टवर उतरल्यावर समोरच्या प्रतिस्पर्ध्यास हरवणे हेच उद्दिष्ट असते. मग, समोर फेडरर असला, तरी विजय हेच उद्दिष्ट आपण ठेवायला हवे.’’

फेडरर कारकिर्दीत २००७ पासून आतापर्यंत केवळ तिसऱ्यांदा पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूकडून हरला. फेडरर म्हणाला, ‘‘आज माझी सुरवातच चांगली नव्हती. उद्या पुन्हा नव्याने चांगली सुरवात करायची. सरावासाठी मी दुबईत लवकर आलो होतो. या सामन्यात मला अनेक संधी मिळाल्या. त्या मला साधता आल्या नाहीत. आता सगळे पचवायची मी सवय करत आहे.’’

पुरुष एकेरीत अन्य लढतींतून अव्वल मानांकित अँडी मरे, फिलिप कोलश्रायबर, गेल मोंफिस, फर्नांडो व्हेर्डास्को यांनीदेखील आपली आगेकूच कायम राखली.

निकाल ः
फर्नांडो व्हेर्डास्को वि. वि. रॉबर्टो बौटिस्टा ६-४, ३-६, गेल मोंफिस वि. वि. डॅन इव्हान्स ६-४, ३-६, ६-१, फिलिप कोलश्रायबर वि. वि. डॅनिल मेदवेदेव ६-४, ६-४, अँडी मरे वि. वि. गुलेर्मो गार्सिया लोपेझ ६-२, ६-०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com