मेलबर्न - स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याची ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत स्लोव्हेनियाच्या अल्जाझ बेडेने याच्याशी सलामी होईल. अग्रमानांकित रॅफेल नदाल याच्यासमोर डॉमिनीकाच्या व्हिक्टर एस्ट्रेला बुरगॉस याचे आव्हान असेल. येत्या सोमवारपासून स्पर्धा सुरू होईल.

गेल्या वर्षी फेडरर आणि नदाल यांच्यात अविस्मरणीय अंतिम सामना झाला होता. यात फेडररची सरशी झाली होती. या वेळी फेडरर आणि सहा वेळचा विजेता नोव्हाक जोकोविच ड्रॉच्या एकाच भागात आहेत. जोकोविच कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्याला १४वे मानांकन आहे. जोकोविचसमोर अमेरिकेच्या डावखुऱ्या डोनाल्ड यंग याचे आव्हान असेल. दुसऱ्या फेरीत त्याची फ्रान्सच्या गेल माँफिसशी लढत होऊ शकते.
नदालची चौथ्या फेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नर याच्याशी लढत होऊ शकते. नदाल आणि ग्रिगॉर दिमीत्रोव एकाच भागात आहेत. ग्रिगॉरची सलामी पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या स्पर्धकाशी होईल. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पहिल्या फेरीत थॉमस फॅबियानोशी सामना होईल.