
तिआनजीन (चीन) - जागतिक गटाच्या प्ले-ऑफ गटात प्रवेश करण्यासाठी डेव्हिस करंडक लढतीत उद्यापासून भारताची लढत चीनशी होईल. अनुभवी लिअँडर पेसला या लढतीत स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरीतील विजय मिळविण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर ४२ विजय आहेत. आतापर्यंत डेव्हिस करंडक लढती तीन दिवसांच्या होत होत्या. या वेळेपासून प्रथमच दोन दिवसांत लढत आटोपणार आहे. पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथन पहिल्या एकेरीच्या लढतीत यिबिंगशी लढेल. त्यानंतर जखमी युकीच्या जागी समावेश केलेले सुमित नागल दुसरी लढत झॅंगशी खेळले. शनिवारी दुहेरीत पेस-बोपण्णा-डी वू आणि माओ झिन जोडीशी खेळतील.
तिआनजीन (चीन) - जागतिक गटाच्या प्ले-ऑफ गटात प्रवेश करण्यासाठी डेव्हिस करंडक लढतीत उद्यापासून भारताची लढत चीनशी होईल. अनुभवी लिअँडर पेसला या लढतीत स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरीतील विजय मिळविण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर ४२ विजय आहेत. आतापर्यंत डेव्हिस करंडक लढती तीन दिवसांच्या होत होत्या. या वेळेपासून प्रथमच दोन दिवसांत लढत आटोपणार आहे. पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथन पहिल्या एकेरीच्या लढतीत यिबिंगशी लढेल. त्यानंतर जखमी युकीच्या जागी समावेश केलेले सुमित नागल दुसरी लढत झॅंगशी खेळले. शनिवारी दुहेरीत पेस-बोपण्णा-डी वू आणि माओ झिन जोडीशी खेळतील. परतीच्या एकेरीच्या लढती त्याच दिवशी होतील.