esakal | दुखापतीमुळे शारापोवाची विंबल्डनमधून अखेर माघार
sakal

बोलून बातमी शोधा

दुखापतीमुळे शारापोवाची विंबल्डनमधून अखेर माघार

दुखापतीमुळे शारापोवाची विंबल्डनमधून अखेर माघार

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - रशियाच्या मारिया शारापोवा हिने मांडीच्या दुखापतीमुळे आगामी विंबल्डन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. उत्तेजक सेवन प्रकरणात टाकलेली बंदी संपल्यानंतर शारापोवाने कोर्टवर पुनरागमन केले होते. अर्थात, तिच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या सहभागावरून बरीच चर्चा झाली होती. विंबल्डन स्पर्धेत तिला पात्रता फेरी खेळावी लागणार होती; मात्र मांडीची दुखापत अजून बरी झाली नसल्याने तिने या प्रमुख स्पर्धेतून माघार घेण्याचेच ठरवले. शारापोवा आता ३१ जुलैपासून सुरू होणाऱ्या स्टॅनफोर्ड टेनिस स्पर्धेत खेळणार आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत १७८व्या स्थानावर आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत थेट पात्र ठरण्यास अपयशी ठरल्यानंतर तिला संयोजकांनी उत्तेजक सेवनाचा आरोप असल्यामुळे वाइल्ड कार्ड प्रवेशही नाकारला होता.