जोकोविचचा ‘मेंटॉर’ अगासींना ‘बाय-बाय’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

लंडन - पुनरागमनात सारखा अपयशी ठरत असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने सुपर कोच तसेच एक काळ गाजविलेले दिग्गज आंद्रे अगासी यांना बाय-बाय केला आहे.

अगासी ४७ वर्षांचे असून, त्यांनी ईएसपीएनला एका निवेदनाद्वारे ही माहिती कळविली. त्यांनी म्हटले आहे, की नोव्हाकला मी केवळ सर्वोत्तम हेतूनेच मदत करण्याचा प्रयत्न केला, पण आमचे वारंवार दुमत होत होते. असहमती दर्शविण्यासाठी सहमत होण्याचे प्रसंग सारखे येत राहिले. पुढे वाटचाल करण्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो.

गेल्या वर्षी मे महिन्यात पार्टटाइम मेंटॉर म्हणून सक्रिय होण्यास अगासी यांनी तयारी दर्शविली होती. निवडक स्पर्धांसाठी ते जोकोविचला मार्गदर्शन करणार होते. पत्नी तसेच महिला टेनिसची साम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने अगासी यांचे मन वळविले होते. जोकोविचसुद्धा तेव्हा फार उत्सुक होता. तो म्हणाला होता, की भविष्यात काय घडते ते आम्ही पाहू. एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही भागीदारी कशी पुढे जाते याची उत्सुकता आहे.

फ्रेंच ओपनपूर्वी ही भागीदारी आकारास आली, पण जोकोविचला अपेक्षित यश येऊ शकले नाही.

आता चेक प्रजासत्ताकाचे माजी टेनिसपटू रॅडेक स्टेपानेक हेच त्याचे एकमेव मार्गदर्शक असतील.

Web Title: sports news novak djokovic andre agassi tennis