रॉटरडॅम - टेनिसच्या इतिहासात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा सर्वाधिक बुजुर्ग मानकरी बनण्याचा पराक्रम केल्यानंतर स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडरर याने शंभर विजेतेपदांचे ध्येय ठेवले आहे. त्याने रॉटरडॅममधील स्पर्धा जिंकून ९७वे विजेतेपद मिळविले.

३६ वर्षांचा फेडरर अतुलनीय कारकिर्दीत पाठोपाठ विक्रम करीत आहे. आता व्यावसायिक युगातील १०९ विजेतेपदांचा अमेरिकेच्या जिमी कॉनर्स यांचा विक्रम मोडण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे. याविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘पहिले ध्येय शंभर विजेतेपदांचे आहे. ९७ म्हणजे शंभर नव्हे. अंतिम फेरीपर्यंत जायचे असेल, तर मला तंदुरुस्त राहावे लागेल. परिस्थिती वेगाने बदलू शकते.’’
फेडररने कारकिर्दीत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. यापूर्वी तो २००५ व २०१२ मध्ये जिंकला होता. तो म्हणाला, की इतक्या वर्षांनी अव्वल क्रमांक मिळविला, यावर विश्वासच बसत नाही. हा कारकिर्दीतील एक सर्वोत्तम सप्ताह आहे. तो पुढे म्हणाला, की सप्ताहाच्या सुरवातीला उपांत्य फेरी गाठण्याचे ध्येय होते. ते साध्य झाले. त्यानंतर ही कामगिरी निव्वळ आश्चर्यकारक आहे. मला खरोखरच फार आनंद झाला आहे.
फेडरर अव्वल होण्याच्या अपेक्षेमुळे या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळाला. एक लाख २० हजार प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद लुटला.