ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक गोसावी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 February 2018

पुणे  - ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक सत्येंद्र प्रकाश गोसावी (वय ८५) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा हिमांशू व एक मुलगी असा परिवार आहे. टेनिस प्रशिक्षकच असलेले हिमांशू यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वडील पपी गोसावी नावाने ओळखले जात. त्यांनी आधी डेक्कन जिमखाना व नंतर पीवायसी हिंदू जिमखान्यावर टेनिसपटू घडविले. यात डेव्हिस करंडक संघातील शशी मेनन, नंदन बाळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवर ते प्रौढ स्पर्धांत प्रेमजित लाल, जयदीप मुखर्जी, रामनाथन कृष्णन, नियाझ उल लतीफ, प्रेमकिशोर, आदी खेळाडूंसह खेळले. त्यांनी ४५, ५५ वयोगटांतील स्पर्धा जिंकल्या. दुहेरीत ते डॉ. अरुण दाते यांच्याबरोबर खेळले.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssports news tennnis trainer satyendra gosavi death